Saturday, February 18, 2012

Hindu Samhati Rally in Bengal Makes Front Page News in Maharashtra
Dainik Sanatan Prabhat

कोलकाता येथे तृणमूल काँग्रेसच्या तीव्र विरोधानंतरही हिंदु ऐक्याचा अविष्कार !

हिंदूंनो, बंगालची पाकिस्तानच्या दिशेने होत असलेली वाटचाल जाणा !
‘हिंदु संघती’च्या चौथ्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने आयोजित सभेत १२ सहस्र हिंदूंची उपस्थिती

*  न्यायायालयाने सभा घेण्यास अनुमती देऊनही पोलिसांचा सभेला तीव्र विरोध
*  पोलिसांचा ‘भारतमाता की जय’, ही घोषणा देण्यास विरोध ! घोषणा देणार्‍यांना अटक करण्याची धमकी
*  पोलिसांकडून सभेसाठी येणार्‍यांना वाटेतच अडवण्याचा अश्लाघ्य प्रकार
* ज्या मैदानात सभा घेतली जात होती, त्या मैदानाच्या प्रवेशद्वारांना इतिहासात प्रथम टाळे लावण्याची पोलिसांची हिंदुद्वेष्टी कृती


कोलकाता - अनेक अडथळ्यानंतर आणि तृणमूल काँग्रेस पक्षाच्या शासनाने केलेल्या प्रखर विरोधानंतर ‘हिंदु संघती’ या बंगालमधील प्रखर हिंदुत्ववादी संघटनेने आयोजित केलेली सभा आज धर्माभिमानी वंगबंधूंच्या प्रखर धर्मनिर्धारामुळ मोठ्या उत्साहात पार पडली. ‘हिंदु संघतीr’ या संघटनेच्या ४ थ्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने ही सभा आयोजित करण्यात आली होती. १२ सहस्रांहून अधिक वंगबंधू या सभेसाठी बंगालच्या खेड्यापाड्यांतून आले होते. 

या वेळी स्वामी प्रदीप्तानंदजी, स्वामी तेजसनंदजी, आचार्य योगेश शास्त्री, मायकल उपाख्य वृंदावन पारकर, डॉ. गौतम सेन, डॉ. निलमाधव दास, श्री. तपन घोष, श्री. रमेश शिंदे आणि श्री. अभय वर्तक आदी मान्यवर व्यासपिठावर उपस्थित होते. हिंदुद्वेष्ट्या तृणमूल काँग्रेसच्या प्रखर विरोधामुळे पोलिसांनी सभा घेण्यास अनुमती नाकारली होती, तसेच ‘हिंदु संघती’च्या कार्यकर्त्यांनाही अटक करण्याचे सत्र चालू केले होते. त्यामुळे सभा होईल कि नाही, याविषयी संभ्रम होता; मात्र ‘हिंदु संघती’च्या कार्यकर्त्यांनी उच्च न्यायालयात जाऊन सभेची अनुमती मिळवून दुपारी दीड वाजता चालू होणारी सभा दुपारी ३.४५ वाजता चालू केली. सभा उशिरा चालू झाल्याने सभेत श्री. वृंदावन पारकर, श्री. रमेश शिंदे, श्री. गौतम सेन आणि स्वामी तेजसनंदजी असे पाचजणच बोलू शकले.
या वेळी श्री. तपन घोष यांना हिंदु जनजागृती समितीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा, तसेच सनातन संस्थेच्या वतीने सनातननिर्मित २८.९ टक्के कृष्णतत्त्व असलेली श्रीकृष्णार्जुनाची प्रतिमा भेट देण्यात आली.
आपल्यातील हिंदुत्व जागवण्यासाठी सत्याच्या मार्गावरून जायला हवे ! - वृंदावन पार्कर, अमेरिका
अमेरिका येथील श्री. ब्रेयन पार्कर (आता ते हिंदु धर्मानुसार साधना करत असल्याने त्यांचे सध्याचे नाव श्री. वृंदावन पारकर असे आहे.) म्हणाले, ‘‘७२ मुसलमान संघटना असलेला हिंदुस्थान हा एकमेव देश आहे. विश्वातील सर्व मुसलमान देशांमध्ये महिलांना तुच्छ लेखले जाते; परंतु बांगलादेश आणि पाकिस्तानमध्ये महिलांना पंतप्रधानही बनवले गेले होते. हे दोन देश मूलतः हिंदुस्थानाचीच अंगे होती, त्यामुळेच तेथे इतर मुसलमान देशांच्या तुलनेत महिलांना थोडेतरी महत्त्व आहे. यातून भारतीय संस्कृतीचे महत्त्व लक्षात येते. आज नवनवीन रस्ते, इमारती, रुग्णालये बांधली जात आहेत; परंतु जुने रस्ते, इमारती, रुग्णालये आपण सांभाळू शकत नाही, तर नवीन बांधण्याची काय आवश्यकता ? आज आपल्यातील हिंदुत्व जागवण्यासाठी (जतन करण्यासाठी) सत्याच्या मार्गावरून जायला हवे. आपल्यात संघटितपणा निर्माण व्हायला हवा. आपल्या विरोधकांचे (मुसलमानांचे) बळ केवळ संघटितपणातच आहे. आपल्या धर्माचे महत्त्व साधु, संत, ऋषी यांची साधना आणि तपश्चर्या यांमुळेच आहे.  सहस्रोंच्या संख्येने हिंदूंनी एकत्र येऊन राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणाचे कार्य करायला हवे. बंगालचे ‘रॉयल बेंगॉल टायगर’ नेताजी सुभाषचंद्र बोस, स्वामी अरविंद यांनी महान इतिहास घडवला आहे. आपण विश्वभरातील सर्व देशांमध्ये हिंदूंच्या या महान संस्कृतीचा प्रसार करू. आम्ही हिंदू सर्वांवर प्रेम करतो; परंतु आमच्याकडूनच सर्वाधिक चुकीचे वर्तन केले जात आहे. ‘हिंदू संघती’ ही संघटना आणि त्यांचे संस्थापक श्री. तपन घोष यांच्या नेतृत्वाखाली हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारांच्या विरोधात सगळे संघटित झाले, हा एक चांगला संकेत आहे.’’
  लंडन येथील श्री. गौतम सेन म्हणाले, ‘‘आम्ही विदेशात रहातो; पण विश्वातील सर्व हिंदू एक आहोत.’’

पृथ्वीला हिंदूंवर होणारे अन्याय कळावेत, यासाठी हा मंच एक माध्यम आहे ! - तपन घोष, संस्थापक, हिंदु संघती
‘हिंदु संघती’ या संघटनेचे संस्थापक श्री. तपन घोष म्हणाले,‘‘ सनातन संस्थेचे प्रवक्ते श्री. अभय वर्तक अन् हिंदु जनजागृती समितीचे प्रवक्ते श्री. रमेश शिंदे महाराष्ट्रातून, तरुण हिंदू या संघटनेचे संस्थापक डॉ. नीलमाधव दास धनबाद, झारखंड येथून, श्री. गौतम सेन लंडन येथून, तर श्री. वृंदावन पारकर हे अमेरिकेतून या सभेसाठी आले आहेत. या सर्वांप्रती मी ‘हिंदु संघती’च्या वतीने विशेष कृतज्ञता व्यक्त करतो. आज देशभरात मुसलमान अत्याचार करत आहेत. प्रसारमाध्यमांच्या चुकीच्या धोरणांमुळे समाजातील सर्वसाधारण मनुष्यापर्यंत सत्य पोहोचतच नाही. हिंदूंची सद्यस्थिती सर्वसाधारण मनुष्यापर्यंत पोहोचण्यासाठी आज गावागावांतून सर्वसामान्य हिंदू या सभेत उपस्थित राहिले आहेत. पृथ्वीला हिंदूंवर होणार्‍या अन्याय कळावेत, यासाठी हा मंच एक माध्यम आहे. आज शासन आणि पोलीस यांच्या अत्याचारांमुळे जी स्थिती निर्माण झाली आहे, त्यासाठी उरलेल्या वक्त्यांना बोलण्याची संधी मिळाली नाही, यासाठी मी सर्वांची क्षमा मागतो.’’

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी  संघटित व्हायला हवे ! - रमेश शिंदे, प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती 
हिंदु जनजागृती समितीचे प्रवक्ते श्री. रमेश शिंदे म्हणाले, ‘‘हिंदुस्थानातील आपण सर्व हिंदू एक आहोत. सगळ्यांना हे कळावे, यासाठी मी महाराष्ट्रातून बंगालमध्ये आलो आहे. ज्यांना या देशात रहायचे आहे, त्यांना ‘वन्दे मातरम्’ म्हणावेच लागेल. ज्यांना या भूमीला वंदन करायचे नसेल, ते खुशाल पाकिस्तानात जाऊ शकतात. मुसलमानांना ‘भाई भाई’ म्हणायचे असेल, तर त्यांनीही गोमातेला आणि भारतमातेला ‘माता’ म्हटलेच पाहिजे, नाहीतर ते ‘भाई’ नाहीत, तर ‘कसाई’ आहेत, असेच आम्हाला समजावे लागेल. स्वामी विवेकानंद जेव्हा अमेरिकेत गेले होते, तेव्हा एक अमेरिकन व्यक्तीने त्यांना विचारले, ‘‘हिंदू धर्म आणि इतर धर्म यांमधील भेद तुम्ही एका वाक्यात सांगू शकता का ?’’ त्यावर स्वामीजी म्हणाले, ‘‘हिंदू धर्मात आपली धर्मपत्नी सोडून इतर सर्व स्त्रियांना माता मानले जाते; परंतु इतर धर्मात आपली माता सोडून इतर सर्व स्त्रियांना पत्नीसारखे मानले जाते. हे आमच्या धर्माचे महत्त्व आहे. पाकिस्तानमध्ये ८ टक्के हिंदू होते, ते आता १ टक्का झाले. बांगलादेशमध्ये ३० टक्के हिंदू होते, ते ८ टक्के झाले. भारतात १०० टक्के हिंदू होते, ते ७० टक्के झाले. कायद्यानुसार बंदी असूनही काल रात्री येथे मशिदीसमोर रात्री १० ते १२ या वेळेत सभा झाली. जर तिथे सभा होऊ शकते, इथे होऊ शकत नाही का ? यासाठीच हिंदूंना एकत्र यायला हवे. भारतातील सर्व हिंदूंनी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी संघटित व्हायला हवे, धर्मशिक्षण घेऊन हिंदु राष्ट्र बनवायला हवे !’’
कार्यक्रमाच्या प्रारंभी सभेला संबोधित करतांना धनबाद, झारखंड येथील तरुण हिंदू या संघटनेचे संस्थापक डॉ. नीलमाधव दास म्हणाले, ‘‘आज हिंदूंच्या संघटनाची आवश्यकता आहे.’’ हिंदूंची सद्यस्थिती त्यांनी या वेळी सर्वांसमोर मांडली. 

प्रसारमाध्यमांचा पुन्हा एकदा दिसून आलेला प्रखर हिंदुद्वेष !
बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसचे शासन, स्थानिक प्रशासन आणि पोलीस यांनी हिंदु संघतीच्या सभेला तीव्र विरोध केला. सभा होईल कि नाही, या विषयी दुपारी तीनपर्यंत संभ्रम होता. अशा स्थितीत दुपारी ३.४५ वाजता सभा चालू होऊनही सभेला १२ सहस्र धर्माभिमानी उपस्थित होते. एरव्ही हिंदुविरोधकांच्या नगण्य उपस्थितांच्या सभेची ‘ब्रेकिंग न्यूज’ देणार्‍या सर्व वृत्तवाहिन्यांनी या महत्त्वाच्या वृत्ताकडे दुर्लक्ष केले. हाच मुसलमानांचा शंभर माणसांचा कार्यक्रम असता, तर त्याचे वृत्त सर्वांनीच दाखवले असते.

‘सुदर्शन’ वाहिनीने जपले हिंदुत्व !
हिंदु संघतीच्या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण ‘सुदर्शन’ या हिंदुत्ववादी वृत्तवाहिनीने दाखवले. एक हिंदुत्ववादी संघटना म्हणून हिंदु जनजागृती समिती आणि प्रखर हिंदुत्व जोपासणारी सनातन संस्था यांच्या प्रवक्त्यांनी ‘सुदर्शन’ वाहिनीचे आभार मानून अभिनंदन केले आहे.  
क्षणचित्रे
१. सभेला १२ सहस्र लोकांची उपस्थिती होती. पोलिसांच्या भयामुळे आणि सभा होईल कि नाही, या विचारामुळे बरेच लोक सभेतून परत गेले. 
२. ३०० हून अधिक महिला आणि पुरुष पोलीस या सभेत आले होते. 
३. सभेची वेळ दुपारी २ ची होती; परंतु दुपारी १२.३० वाजेपर्यंत सभास्थानाचे फाटक पोलिसांनी उघडू दिले नाही. 
४. सभेतील कार्यकर्त्यांनी केवळ १ घंट्यात सभेची सिद्धता केली. 
५. रमेश शिंदे यांचे भाषण चालू असतांना ‘जय शिवाजी, जय भवानी !’ अशा घोषणा बंगाली बांधवांनी दिल्या.
६. अमेरिकेतील एक हिंदु वक्ते श्री. वृंदावन पारकर यांनी इंग्रजीत भाषण केले. त्यांच्या भाषणाचे हिंदु संघतीचे संस्थापक श्री. तपन घोष यांनी बंगालीमध्ये भाषांतर करून सांगितले. त्यांनी हिंदीमध्ये ‘भारत माता की जय’ अशी घोषणा दिल्यावर लोकांनी त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.


हिंदु संघतीच्या सभेच्या संदर्भातील घटनाक्रम म्हणजे बंगालचे वेगाने इस्लामीकरण होत असल्याचे द्योतक !
* १४ जानेवारी या दिवशी हिंदु संघतीने पोलिसांकडे सभेच्या अनुमतीसाठी अर्ज केला. 
* ३० जानेवारी या दिवशी सभेला पोलीसदल आणि कोलकाता महानगरपालिका यांच्याकडून अनुमती मिळाली.
* ‘कोलकाता बूक फेअर’मध्ये कार्यक्रमाच्या निमंत्रणाची पत्रके वाटण्यात आली. त्यात मुसलमान आरक्षणाच्या विरोधाचे सूत्र होते. या सूत्रावरून सभेला होणारा विरोध वाढत गेला.
* ८ फेब्रुवारी या दिवशी अचानक सभेची अनुमती महापालिकेकडून रहित करण्यात आली. त्यासाठीचे कारण सुस्पष्ट करण्यात आले नाही. ‘‘याचे कारण आम्ही सांगू शकत नाही’’, असे सांगण्यात आले. सभेला विरोध करण्यामध्ये स्थानिक मुसलमान पुढारी आणि खासदार आघाडीवर होते. त्यांच्या दबावामुळेच पोलिसांनी अनुमती नाकारली होती.
* पोलिसांनी अनुमती नाकारल्यानंतर एका ८२ वर्षांच्या हिंदुत्ववादी कार्यकर्त्याला अटक करण्यात आली.
* नंतर आणखी २ कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली.
* ‘कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली आणि पोलिसांनी अनुमती नाकारली, तरीही आम्ही सभा घेऊच !’, असे हिंदु संघतीचे श्री. तपन घोष यांनी घोषित केले. 
* पोलिसांनी तोंडीच सांगितले की ‘‘कार्यक्रम घेऊ शकत नाही.’’
* ८ फेब्रुवारी या दिवशी अधिकृतरित्या ‘शासनाचा कार्यक्रम आहे म्हणून कार्यक्रम घेऊ शकत नाही’, असे कारण सांगून पोलिसांनी लिखित पत्र देऊन अनुमती नाकारली. (खोटारडे पोलीस ! - संपादक)
* १० फेब्रुवारी या दिवशी हिंदुत्ववाद्यांनी उच्च न्यायालयात अर्ज केला.
* १३ फेब्रुवारी या दिवशी निकाल ‘हिंदु संघतीr’च्या बाजूने लागला.
* १३ फेब्रुवारी या दिवशी संध्याकाळी पोलिसांनी मैदानाच्या दरवाजाला टाळे ठोकले. ज्या मैदानावर सभा होणार होती, त्या मैदानाला एवढ्या वर्षांत प्रथमच टाळे ठोकण्यात आले. (यातून पोलीस आणि राज्यकर्ते यांचा हिंदुद्वेष किती प्रखर आहे, हेच स्पष्ट होते. - संपादक)
*  १४ फेब्रुवारी या दिवशी दुपारी २.१० वाजता पोलिसांनी ‘भारतमाता की जय’ असा जयघोष करणार्‍या राष्ट्राभिमानी हिंदूंवर लाठीमार केला. (काँग्रेस, तृणमूल काँग्रेस आणि साम्यवादी पक्ष यांसह सर्वच राजकीय पक्षांनी मुसलमानांचे लांगूलचालन करण्यासाठी ‘भारतमाता की जय’ आणि ‘वंदे मातरम्’ म्हणण्यावर अघोषित बंदी घातली होती. आता त्यांनी उघडपणे बंदी घालून भारताचे वेगाने इस्लामीकरण करून शरियत कायदा भारतात लागू करण्याचेच संकेत दिले आहेत. हिंदूंनो, आता तरी जागे व्हा आणि संघटित होऊन हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी सिद्ध व्हा ! - संपादक )

सभेला झालेला समाजकंटकांचा आणि मुसलमाधार्जिण्या पोलिसांचा विरोध
येथील बांधकाम चालू असलेले व्यासपीठ अज्ञातांनी येऊन तोडून टाकले.
* येथे सजावट आणि तांत्रिक, ध्वनीक्षेपक यंत्रणा बसवणार्‍या कर्मचार्‍यांना धमक्या देण्यात आल्या. त्यांचे काम थांबवण्यात आले ‘‘येथील कार्यक्रम रहित झाला आहे, तुम्ही जा, नाहीतर तुम्ही पकडले जाल’’, असे त्यांना पोलिसांनी सांगितले. (यातून बंगालमधील पोलीस मुसलमानांचे गुलामच बनले आहेत, हेच स्पष्ट होते आहे. असे पोलीस जनतेचे आणि राष्ट्राचे रक्षण काय करणार ? ही स्थिती पालटण्यासाठी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेला पर्याय नाही ! - संपादक)
* संपूर्ण मैदानाला पोलीस छावणीचे स्वरूप आले होते.
* सर्वांत कहर म्हणजे जसजसे हिंदु सभास्थानी यायला लागले , तसतसा पोलिसांनी जाणीवपूर्वक मधून मधून लाठीमार चालू केला. (हिंदूंवर लाठ्या चालवणार्‍या या पोलिसांनी मुसलमानांवर अशा लाठ्या चालवल्या असत्या का ? - संपादक)
* काही ठिकाणी सभास्थानी येणार्‍या धर्माभिमान्यांना पोलिसांनी मार्गातच अडवले होते.


 हे धर्माभिमानी हिंदूच हिंदु राष्ट्राच्या यज्ञासाठी त्यांची आहुती देण्यासाठी सिद्ध होतील !
* पहाटे तीन वाजल्यापासून मुले आणि महिला या कार्यक्रमासाठी घरातून बाहेर पडल्या होत्या. त्यांना कार्यक्रमस्थळी जाण्यापासून रोखण्यात आले आणि त्यांना त्रास देण्यात आला.
* सभेला शासनाकडून मोठ्या प्रमाणात विरोध होऊनही हिंदु धर्माभिमान्यांमध्ये खूप उत्साह होता. पोलीस लाठीमार करत असूनही हिंदूंच्या चेहर्‍यावर भीतीचा लवलेशही नव्हता. सभेपूर्वी एवढा गोंधळ होऊनही सर्व हिंदु अतिशय उत्साहात होते.
* ‘हे सर्व पाहून धर्मावर प्रेम कसे असावे, ते लक्षात आले. हिंदूंमध्ये धर्माभिमान कसा असावा, ते शिकायला मिळाले’, असे स्थानिकांनी सांगितले.


No comments:

Post a Comment